अथ श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
श्रद्धात्रयविभागयोगो नाम सप्तदशोऽध्यायः ।
इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या
उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील
कृष्णार्जुनसंवादापैकी
श्रध्दात्रयविभागयोग नावाचा
सत्रावा अध्याय
अर्जुन उवाच ।
ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः ।
तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्त्वमाहो रजस्तमः ॥ १
अर्जुन म्हणाला‚
विधिवत् ना तरि श्रध्दापूर्वक
योगि यज्ञ करिती
निष्ठा त्यांची कशी गणावी?
सात्विक‚ राजस‚ तमसी? १
श्रीभगवानुवाच ।
त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा ।
सात्त्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु ॥ २
श्री भगवान म्हणाले‚
त्रिगुणांच्या अनुषंगे ठरते
देहधारिची निष्ठा
ऐक कशी ते आता सांगतो तुज
मी‚ कुंतीसुता २
सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत ।
श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः ॥ ३
प्रकृतिस्वभावानुरूप
श्रध्दा मनुजाची‚ भारत
ज्याची श्रध्दा जिथे तसा
तो स्वत: असे घडत ३
यजन्ते सात्त्विका देवान्यक्षरक्षांसि राजसाः ।
प्रेतान्भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः ॥ ४
सत्वगुणी पूजिति देवांना‚
राजस यक्षांना‚
तामसगुणी जन वंदन करिती
भूतप्रेत यांना ४
अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपो जनाः ।
दम्भाहङ्कारसंयुक्ताः कामरागबलान्विताः ॥ ५
दंभ‚ गर्व ज्यांच्यामधि
भरला अन् कामासक्ती
असे अडाणी शास्त्रबाह्य
अन् घोर तपे आचरिती ५
कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः ।
मां चैवान्तःशरीरस्थं तान्विद्ध्यासुरनिश्चयान् ॥ ६
अशा तपाने कष्टविती देहस्थ
महाभूतां-
पर्यायाने मला‚ असति ते
असुरवृत्ति‚
पार्था ६
आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः ।
यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु ॥ ७
आहाराचे जसे मानिती तीन
विविध वर्ग
तसे यज्ञ‚ तप‚ दानाचेही,
ऐक सांगतो मर्म ७
आयुःसत्त्वबलारोग्यसुखप्रीतिविवर्धनाः ।
रस्याः स्निग्धाः स्थिरा हृद्या आहाराः सात्त्विकप्रियाः ॥ ८
(आहार)
सत्वगुणींना प्रिय ऐसा आहार
वाढवी प्रीती‚
समृध्दी‚ बल‚ आरोग्य‚ आयु‚
सुख‚ सात्विकवृत्ती
पौष्टिक असुनी रसाळ आणि
स्निग्ध असे अन्न
दीर्घकाल ठेविते मनाला शांत अन प्रसन्न ८
कट्वम्ललवणात्युष्णतीक्ष्णरूक्षविदाहिनः ।
आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदाः ॥ ९
आंबट‚ खारट‚ कटू‚ झणझणित‚
तिखट‚ दाहकारक
अन्न आवडे राजसगुणीना‚ शोकरोगदायक ९
यातयामं गतरसं पूति पर्युषितं च यत् ।
उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम् ॥ १०
शिळे, निरस‚ दुर्गंधियुक्त
अन सडलेले‚ उष्टे‚
अपवित्र असे अन्न तामसी
लोकां प्रिय असते १०
अफलाङ्क्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य इज्यते ।
यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्त्विकः ॥ ११
(यज्ञ)
आस फलाची न धरुन केला
यज्ञ विधीपूर्वक
शांतपणे, संतुष्ट मने, तो
यज्ञ असे सात्विक ११
अभिसन्धाय तु फलं दम्भार्थमपि चैव यत् ।
इज्यते भरतश्रेष्ठ तं यज्ञं विद्धि राजसम् ॥ १२
दंभ माजवुन फलाभिलाषा धरून
होर्इ यजन
तो यज्ञ असे‚ भरतश्रेष्ठा‚
राजस हे जाण १२
विधिहीनमसृष्टान्नं मन्त्रहीनमदक्षिणम् ।
श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते ॥ १३
कसाबसा उरकला यज्ञ, दक्षिणा
प्रसाद न देता
मंत्रांवाचुन अन् श्रध्देवाचुन,
तो तामस‚ पार्था १३
देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवम् ।
ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते ॥ १४
(तप)
देव, ब्राह्मण,
गुरु,
विद्वज्जन यांना वंदुनिया
विशुध्द ब्रह्माचरण,
अहिंसापूर्ण तपश्चर्या
पवित्रतेने,
विनम्रतेने, सद् भावे करती
शास्त्रामध्ये अशा तपाला
‘कायिक तप’
म्हणती १४
अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् ।
स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते ॥ १५
सत्यप्रिय हितकारि असुनि
जे उद्वेगजनक
नसे
अशा भाषणाला पार्था ‘वाचिक
तप’ संज्ञा
असे १५
मनः प्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः ।
भावसंशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते ॥ १६
प्रसन्नवृत्ती,
सौम्य स्वभाव
अन् मितभाषण‚ संयम‚
शुध्द भावना‚ या सर्वांना
‘मानस तप’ नाम १६
श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः ।
अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्त्विकं परिचक्षते ॥ १७
तिन्हि प्रकारची तपे केलि
जर निरिच्छ श्रध्देने
तर धनंजया‚ तपांस ऐशा
सात्विकांत
गणणे १७
सत्कारमानपूजार्थं तपो दम्भेन चैव यत् ।
क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवम् ॥ १८
मानासाठी अथवा दांभिकतेपोटी
केलेले
क्षणकालिक ते तप ठरते, त्या
'राजस' म्हटलेले १८
मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपः ।
परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम् ॥ १९
स्वत:स पीडाकारी अथवा इतरांही
मारक
मूर्खपणे केलेले ऐसे तप
'तामस' नामक १९
दातव्यमिति यद्दानं दीयतेऽनुपकारिणे ।
देशे काले च पात्रे च तद्दानं सात्त्विकं स्मृतम् ॥ २०
(दान)
योग्य काळ स्थळ आणि पात्रता
पूर्ण पारखून
परतफेडिची आस न धरता केलेले
दान
पवित्र ऐसे कर्तव्यच ते
मानुन केलेले
त्या दानाला 'सात्विक' ऐसे
असते गणलेले २०
यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः ।
दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम् ॥ २१
फेड म्हणुनि वा हेतु ठेवुनी
वा नाराजीत
केल्या दाना शास्त्रामध्ये
'राजस' म्हणतात २१
अदेशकाले यद्दानमपात्रेभ्यश्च दीयते ।
असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम् ॥ २२
अयोग्य काळी, स्थळी, अपात्रा,
अन् करुनि
अवज्ञा
दान दिले जे शास्त्रांत तया 'तामस' ही संज्ञा २२
ॐतत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः ।
ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा ॥ २३
ओम् तत् सत् हे तीन शब्द परब्रह्म
वर्णितात
तसेच ब्राह्मण,
वेद,
यज्ञ हे
त्यांतुन अवतारत २३
तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतपःक्रियाः ।
प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनाम् ॥ २४
यज्ञ, दान, तप या सर्व कृतींच्या
आचरणात
ब्रह्मवादि
‘ओम्’
उच्चारच प्रारंभी
करतात २४
तदित्यनभिसन्धाय फलं यज्ञतपःक्रियाः ।
दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकाङ्क्षिभिः ॥ २५
तत् शब्दातुन सूचित होते
निरपेक्षा वृत्ती
यज्ञ, दान, तप करताना तत्
म्हणती मोक्षार्थी २५
सद्भावे साधुभावे च सदित्येतत्प्रयुज्यते ।
प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थ युज्यते ॥ २६
सत्त्वशील
अस्तित्व होतसे ‘सत्’ मधुनी व्यक्त
त्यास्तव
उचित अशी कर्मेही
सत् मधि गणतात २६
यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते ।
कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते ॥ २७
यज्ञ,
तपस्या,
दान यांत
स्थिरवृत्ती
सत् असते
त्यांच्यास्तव कर्तव्य कर्म
जे तेही सत् ठरते २७
अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् ।
असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह ॥ २८
श्रध्दाविरहित यज्ञ, तपस्या,
आणि अपात्री दान
असत् म्हणुनि त्यां ना येथे
ना परलोकी स्थान २८
इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
श्रद्धात्रयविभागयोगो नाम सप्तदशोऽध्यायः ॥
अशा प्रकारे येथे श्रीमद्भगवद्गीतेच्या
उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील
कृष्णार्जुनसंवादापैकी
श्रध्दात्रयविभागयोग नावाचा
सत्रावा अध्याय पूर्ण झाला
श्री मुकुंद नवरे कळवितात:
उत्तर द्याहटवासप्रेम नमस्कार.
आहार आणि स्वभाव हे कसे परस्परांवर अवलंबून असतात हे विषद करणारा हा अध्याय या भावानुवादातून चांगल्या प्रकारे कळून येतो. श्लोक क्र. ७ आणि २० विशेष वाटले तर १४ चा अनुवाद उत्तम वाटला. काही किरकोळ सुचना कराव्याशा वाटतात :
श्लोक क्र. २ मधे 'आता ' शब्द असावा.
श्लोक क्र. ८ मधे दुस-या ओळीत ' आरोग्यायु ' अशी संधी केल्यास गेयता. तसेच चौथ्या ओळीत ' शांत तसेच प्रसन्न ' म्हटल्यास गेयता.
श्लोक क्र. १० मधे दुसरी ओळ ' अन्न असे अपवित्र तामसी लोकां प्रिय असते ' म्हटल्यास गेयता अधिक येते.
श्लोक क्र. २४ मधील रचना खटकते, ' यज्ञ दान तप सर्व कृती ते जेव्हा आचरतात ' म्हणता येईल काय ?
मुकुंद नवरे
डॉ.प्रियंवदा कोल्हटकर लिहितात:
उत्तर द्याहटवाहा १७वा अध्याय सुंदर व सोपा झालाय. धन्यवाद.
श्री भास्कर जोशी लिहितात:
उत्तर द्याहटवाआपले सर्व अध्याय खूपच छान झाले आहेत. आपल्या कार्याला पूर्णपणे दंडवत.