अथ श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
दैवासुरसम्पद्विभागयोगो नाम षोडशोऽध्यायः ॥
इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
दैवासुरसंपद्विभागयोग
नावाचा सोळावा अध्याय
श्रीभगवानुवाच ।
अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः ।
दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम् ॥ १
अहिंसा सत्यमक्रोधस्त्यागः शान्तिरपैशुनम् ।
दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ऱ्हीरचापलम् ॥ २
तेजः क्षमा धृतिः शौचमद्रोहो नातिमानिता ।
भवन्ति सम्पदं दैवीमभिजातस्य भारत ॥ ३
श्रीभगवान
म्हणाले,
अभय,
सत्व, शुचिता अन् निश्चित ज्ञानयोग
पालन‚
संयम,
दातृत्व, यज्ञ, तप अन् विनय, धर्म आचरण १*
सत्य‚ अहिंसा‚
शांति‚ त्याग‚ तुष्टी,
उदार बुध्दी‚
तेज‚ क्षमा‚
सौम्यता‚ विनय‚ निश्चय‚ दया व शुध्दी २*
द्वेषभाव‚ मानाचि हाव‚
अन लोभापासुन मुक्त‚
दैवि पुरूष‚ कौंतेया‚ असतो
अशा गुणांनी युक्त ३*
(*दैवत्वाचे
सव्वीस गुण या तीन श्लोकात वर्णन केले आहेत. मराठीतील रचना सुलभ व्हावी या
प्रयत्नात मूळ क्रम पाळता आला नाही. म्हणून वरील तीन श्लोक एकत्र दिले आहेत.)
दम्भो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च ।
अज्ञानं चाभिजातस्य पार्थ सम्पदमासुरीम् ॥ ४
दांभिकता‚ औध्दत्य‚
गर्व‚ अभिमान‚ क्रोध‚ निष्ठुरता
प्रवृत्ती या अशा असुरी
अज्ञानासमवेता ४
दैवी सम्पद्विमोक्षाय निबन्धायासुरी मता ।
मा शुचः सम्पदं दैवीमभिजातोऽसि पाण्डव ॥ ५
दैवि गुणांची संपत्ती ही असे मोक्षदायक
असुरी
प्रवृत्ती,
धनंजया, ठरे बंधकारक
जन्मजात
तुज
लाभली असे दैवी गुणसंपदा
तेव्हा‚ पार्था‚
करू नको तू कसलीही चिंता ५
द्वौ भूतसर्गौ लोकेऽस्मिन्दैव आसुर एव च ।
दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु ॥ ६
दोन्हि जीव नांदति या
लोकी‚ दैवी
अन असुरी
दैवींबद्दल सांगुन झाले‚
ऐक कसे असुरी ६
प्रवृत्तिं च निवृत्तिं च जना न विदुरासुराः ।
न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते ॥ ७
काय
करावे‚ काय करू नये असुर ना जाणती
शुचिर्भूतता‚ सत्य‚
सदाचरणाचि त्या न माहिती ७
असत्यमप्रतिष्ठं ते जगदाहुरनीश्वरम् ।
अपरस्परसम्भूतं किमन्यत्कामहैतुकम् ॥ ८
असुरांलेखी जग खोटे अन आधाराविण असते
परमब्रह्म ना येथे कोणी जगताचे निर्माते
उद्भव
जगताचा
झालासे विषयसुखाच्यापोटी
याहुन
दुसरे
काय प्रयोजन जगतोत्पत्तीसाठी ८
एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः ।
प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतोऽहिताः ॥ ९
अशा
विचारांचे‚
अल्पमती‚ असुर नष्टात्मे
जगताच्या नाशास्तव करती अहितकारि कर्मे ९
काममाश्रित्य दुष्पूरं दम्भमानमदान्विताः ।
मोहाद्गृहीत्वासद्ग्राहान्प्रवर्तन्तेऽशुचिव्रताः ॥ १०
अशक्य
ज्यांचे
शमन अशा कामेच्छांच्या नादी
लागुन
दांभिक‚ मदोन्मत्त‚
गर्विष्ठ असुर फंदी
भलभलत्या कल्पना करूनि मग पडती मोहात
पापाचरणे करण्याचे जणु घेती संतत व्रत १०
चिन्तामपरिमेयां च प्रलयान्तामुपाश्रिताः ।
कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः ॥ ११
चिंतांनी
आमरण
तयाना असे ग्रासलेले
कामेच्छांच्या पूर्तीसाठी सदा त्रासलेले ११
आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः ।
ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थसञ्चयान् ॥ १२
कामपूर्तिविण दुजे काहिही दिसते ना त्याना
शतसहस्त्र आशापाशांमधी गुरफटलेल्याना
असे
कामक्रोधात
परायण झालेले असुर
त्यांस्तव अनुचित मार्गे करिती धनसंचय फार १२
इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम् ।
इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम् ॥ १३
“‘हे’ धन माझे‚ ‘ते’ही मिळविन” ही
त्यांची कांक्षा,
“आज असे ते
उद्या वाढविन” अशिही
अभिलाषा १३
असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि ।
ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान्सुखी ॥ १४
“या शत्रूला
आज मारले‚ उद्या अधिक मारीन
मी
र्इश्वर‚ मी भोक्ताही‚ मी निश्चित बलवान १४
आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया ।
यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः ॥ १५
धनाढय
मी‚ स्वजनात राहतो‚
मजसम ना कोण
यज्ञ
करिन‚ वा दान करिन‚
वा करीन मी चैन ” १५
अनेकचित्तविभ्रान्ता मोहजालसमावृताः ।
प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेऽशुचौ ॥ १६
अशा
फोल कल्पना
बाळगुनि अज्ञानी‚ मोहित
कामातुर
होउनिया
पडती रौरव नरकात १६
आत्मसम्भाविताः स्तब्धा धनमानमदान्विताः ।
यजन्ते नामयज्ञैस्ते दम्भेनाविधिपूर्वकम् ॥ १७
आत्मतुष्ट‚ धन-मान-मदाने
फुगलेले दांभिक
नावाला
यज्ञयाग
करिती अयोग्य विधिपूर्वक
१७
अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः ।
मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः ॥ १८
असे
अहंकारी‚ माजोरी‚
कामग्रस्त‚ असुर
द्वेष
करुनि निंदती मला मी असता परमेश्वर
१८
तानहं द्विषतः क्रूरान्संसारेषु नराधमान् ।
क्षिपाम्यजस्रमशुभानासुरीष्वेव योनिषु ॥ १९
अशा
नराधम‚ क्रूरात्म्याना‚
दुष्ट असुराना
टाकित
असतो
पापयोनिमधि मीच दुरात्म्याना १९
आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि ।
मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम् ॥ २०
अशा
योनिमधि
जन्मोजन्मी खितपत ते पडती
कधी
न करी
मी जवळ तयां‚ ते अधमगतिस जाती २०
त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः ।
कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत् ॥ २१
काम‚ क्रोध
अन् लोभ ही तिन्ही दारे नरकाची
विनाशकारी म्हणुनी‚
पार्था‚ सदैव टाळायाची २१
एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः ।
आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम् ॥ २२
या
दारांना
टाळुनि नर जो करी तपश्चर्या
आत्मशुध्दि साधुनी परम पदि जार्इ‚
कौंतेया २२
यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः ।
न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम् ॥ २३
शास्त्रविधींना देउन फाटा विषयसुखी वर्तती
ते
परमगती‚ सिध्दी वा सुख काहीच ना मिळवती २३
तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ ।
ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि ॥ २४
शास्त्र
सांगते
योग्य काय अन अयोग्य कुठले कर्म
त्या
आदेशानुसार
कर्मे करणे हा तव धर्म २४
इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
दैवासुरसम्पद्विभागयोगो नाम षोडशोऽध्यायः ॥
अशा प्रकारे येथे श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
देवासुरसंपद्विभागयोग
नावाचा
सोळावा अध्याय पूर्ण झाला.
**********
श्री मुकुंद नवरे कळवितात:
उत्तर द्याहटवा"
सप्रेम नमस्कार.
दैवी संपत्ती आणि आसुरी संपदा यांचे यथार्थ वर्णन करणा-या या अध्यायाचा भावानुवाद आपल्याला निर्विवाद उत्तम साधला आहे यात शंका नाही. या गुण आणि अवगुणांनी भारलेले लोक आपण नेहमी पाहत असतो म्हणून हा अध्याय वैशिष्ट्यपूर्ण असून त्याचा अनुवाद सरळ समजेल इतका आपण सोपा करून सांगितला आहे. अभिनंदन.
आपला
मुकुंद नवरे
काही किरकोळ सूचना :
श्लोक क्र.५ मधे दुसरी ओळ, ' रे ' शब्द गाळावा किंवा ' प्रवृत्ति रे ' म्हणावे.
श्लोक क्र. ११ मधे ' चिंतांनी ' आणि ' तयांना ' म्हणावे.
श्लोक क्र. १२ मधे ' त्यांना ' व ' गुरफटलेल्यांना ' म्हणावे.
श्लोक क्र. १४ मधे ' ईश्वर ' , २२ मधे ' जाई ' ही दुरुस्ती .
"
धन्यवाद मुकुंदजी.
उत्तर द्याहटवाकाही बदल केले आहेत.
डॉ. प्रियंवदा कोल्हटकर लिहितात:
उत्तर द्याहटवाहा अध्याय वाचला कि मला नेहमी प्रश्न पडतो. अहिंसा दैवी गुण आहे, तर मग अर्जुनाला घोर हिंसा करायला का सांगितले?