अथ श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादेअर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः
इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या
उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील
कृष्णार्जुनसंवादापैकी
अर्जुनविषादयोग नावाचा पहिला अध्याय
धृतराष्ट्र उवाच ।धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः ।
मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय ॥१॥
करति काय कुरुक्षेत्री ते मी जाणाया आतुर १
सञ्जय उवाच ।
दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा ।
आचार्यमुपसङ्गम्य राजा वचनमब्रवीत् ॥२॥
पांडवसेनेची झालेली
रचना पाहून
भीष्माचार्यांसमीप
जाउन वदला दुर्योधन २
व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥३॥
द्रुपदपुत्र तुमच्या
शिष्याने केलि तिची रचना ३
अत्र शूरा महेष्वासा
भीमार्जुनसमा युधि ।
युयुधानो विराटश्च
द्रुपदश्च महारथः ॥४॥
शूर धनुर्धर इतके जितके
भीम अन् अर्जून ४
धृष्टकेतुश्चेकितानः
काशिराजश्च वीर्यवान् ।
पुरुजित्कुन्तिभोजश्च
शैब्यश्च नरपुङ्गवः ॥५॥
धृष्टकेतु‚ चेकितान‚ काशीराज‚ वीर्यवान‚
पुरूजित‚ कुंतीभोज‚ शैब्य हे वीर धैर्यवान ५
युधामन्युश्च विक्रान्त
उत्तमौजाश्च वीर्यवान् ।
सौभद्रो द्रौपदेयाश्च
सर्व एव महारथाः ॥६॥
युधामन्यु‚
विक्रांत आणखी उत्तमौज हे रथी
अभिमन्यू समवेत द्रौपदीपुत्रहि
महारथी ६
अस्माकं तु विशिष्टा
ये तान्निबोध द्विजोत्तम ।
नायका मम सैन्यस्य
संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ॥७॥
आता अपुल्या सेनेमधल्या
विशेष वीरांची
नावे मी सांगतो‚
लक्ष द्या‚ स्मृतीत ठेवायची ७
भवान्भीष्मश्च कर्णश्च
कृपश्च समितिञ्जयः ।
अश्वत्थामा विकर्णश्च
सौमदत्तिस्तथैव च ॥८॥
अन्ये च बहवः शूरा
मदर्थे त्यक्तजीविताः ।
नानाशस्त्रप्रहरणाः
सर्वे युद्धविशारदाः ॥९॥
भीष्म‚ कर्ण‚ कृप‚ अश्र्वत्थामा‚
विकर्ण‚ भूरिश्रव
वीर अन्यही स्वप्राणांवर
उदार माझ्यास्तव ८, ९
अपर्याप्तं तदस्माकं
बलं भीष्माभिरक्षितम् ।
पर्याप्तं त्विदमेतेषां
बलं भीमाभिरक्षितम् ॥१०॥
अमर्याद सेना ही अमुची
भीष्माच्या रक्षणीं
मर्यादित ती पांडवसेना
भीम जिचा अग्रणी १०
अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः ।
भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि ॥११॥
“व्यूहमुखे नेमून दिलेली
लढवा‚ शूरांनो
सर्व दिशांनी भीष्मांना
द्या रक्षण वीरांनो” ११
तस्य सञ्जनयन्हर्षं कुरुवृद्धः पितामहः ।
सिंहनादं विनद्योच्चैः शङ्खं दध्मौ प्रतापवान् ॥१२॥
सुयोधनाला आनंदविण्या
भीष्माचार्यानी
प्रतापवान् हा शंख
फुंकिला सिंहनाद करूनि १२
ततः शङ्खाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखाः ।
सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत् ॥१३॥
लगेच भेऱ्या ‚ शंख‚ नौबती या रणवाद्यांनी
करूनी तुंबळ नाद टाकिलें आसमन्त भरूनि १३
ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ ।
माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः ॥१४॥
श्र्वेताश्वांच्या
रथात बसल्या कृष्णअर्जुनानी
प्रत्त्युत्तर मग दिले
आपले दिव्य शंख फुकुनी १४
पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः ।
पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मा वृकोदरः ॥१५॥
हृषिकेशाचा पांचजन्य‚
अन् देवदत्त पार्थाचा
पौंड्र नामक महाशंख
तो बलिष्ठ भीमाचा १५
अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः ।
नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ॥१६॥
युधिष्ठिराचा अनंतविजय‚
सुघोष नकुलाचा
सहदेवाने नाद काढला
मणीपुष्पकाचा १६
काश्यश्च परमेष्वासः शिखण्डी च महारथः ।
धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः ॥१७॥
काशीराज‚ शिखंडि‚ सात्यकी‚ विराट अन् द्रुपद
धृष्टद्युम्न‚
अभिमन्यु आणखी द्रौपदिचे नंद १७
द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते ।
सौभद्रश्च महाबाहुः शङ्खान्दध्मुः पृथक्पृथक् ॥१८॥
या सर्वांनी दणाणले
मग नभ आणिक अवनी
पूर्ण स्वरानें आपआपले
महाशंख फुंकुनी १८
स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् ।
नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् ॥१९॥
अथ व्यवस्थितान्दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः ।
प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ॥२०॥
तुंबळ नादे त्या विदारली
कौरवांचि हृदये
सज्ज जाहले युध्दा
ते‚ ओळखले धनंजये १९,
२०
हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते ।
अर्जुन उवाच ।
सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ॥२१॥
हे धृतराष्ट्रा‚ हृषिकेशासी वदला मग
पांडव
“दोन्ही सैन्यांमधे‚ अच्युता‚ रथ नेउनी ठेव २१
यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् ।
कैर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे ॥२२॥
युध्दासाठी सज्ज जाहले
लोक कोण कोण
कुणासवे मज लढायचे
मी करीन अवलोकन २२
योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः ।
धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः ॥२३॥
दुर्बुध्दी दुर्योधन‚ त्याचे कोण साह्यकर्ते
जमले येथे त्या सर्वां
मज पाहू दे पुरते” २३
सञ्जय उवाच ।
एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ॥२४॥
संजय म्हणाला
धनंजयाचे हे वच ऐकुन
श्री हृषिकेशानी
दो सैन्यांच्या मधे
ठेविला रथ मग नेऊनी २४
भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् ।
उवाच पार्थ पश्यैतान्समवेतान्कुरूनिति ॥२५॥
“भीष्म‚ द्रोण या आचार्यांसह
सर्व वीर अन्य
पहा अर्जुना इथे उपस्थित” वदले श्रीकृष्ण २५
तत्रापश्यत्स्थितान्पार्थः पितॄनथ पितामहान् ।
आचार्यान्मातुलान्भ्रातॄन्पुत्रान्पौत्रान्सखींस्तथा ॥२६॥
श्वशुरान्सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि ।
तान्समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान्बन्धूनवस्थितान् ॥२७॥
तेव्हा पार्थाला दिसले
ते बंधु‚ आप्त‚ मित्र‚
पिता, पितामह‚ श्र्वसुर‚ श्यालक‚ पुत्र तसे पौत्र २६,
२७
कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत् ।
अर्जुन उवाच
।
दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम् ॥२८॥
या सर्वांना पाहुनि
तेथे दोन्ही सैन्यात
खिन्न मनाने‚ दीन वाणिने‚ वदला मग पार्थ २८
सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।
वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ॥२९॥
अर्जुन म्हणाला‚
“हे सारे मम स्वकीय बघुनी युध्दोत्सुक येथे
शिथील पडती गात्रे
माझी‚ मुखहि शुष्क होते २९
गाण्डीवं स्रंसते हस्तात्त्वक्चैव परिदह्यते ।
न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः ॥३०॥
गांडिव हातातून निसटते
अन् तनु थरकापते
राहावते ना उभे नि
माझे मनही भिरभिरते ३०
निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव ।
न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ॥३१॥
दिसति‚ केशवा‚ विपरित मजला युध्दातिल
लक्षणे
कल्याणप्रद ठरेल कैसे
स्वजनांना मारणे? ३१
न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च ।
किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा ॥३२॥
नको विजय अन् नको राज्यही
स्वजनां मारूनिया
उपभोगावे राज्य कसे
रे जिवंत राहुनिया? ३२
येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च ।
त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ॥३३॥
ज्यांच्यासाठी सुखराशींची
मनात अभिलाषा
पहा इथे ते उभे ठाकले
त्यागुन जीवाशा ३३
आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः ।
मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः सम्बन्धिनस्तथा ॥३४॥
पिता, पितामह‚ श्र्वसुर‚ श्यालक‚ पुत्र‚ पौत्र‚ प्रियजन
यांसर्वांसाठी तर धरतो
राज्येच्छा आपण ३४
एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन ।
अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते ॥३५॥
आम्हास मारावया जरी
हे उभे ठाकले इथे
या सर्वांना मारून
उरणे मनास ना पटते
त्रैलोकाचे राज्य जरी
मज मिळेल युध्दातुन
नको मिळाया त्रिलोक
जर तो यांच्या मरणातुन ३५
निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन ।
पापमेवाश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिनः ॥३६॥
मिळेल आम्हा काय जनार्दन
कौरवांस मारूनी?
दुष्ट जरी ते‚ मारूनिया त्या आम्हि
पापाचे धनी ३६
तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान्स्वबान्धवान् ।
स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ॥३७॥
कौरव झाले तरि अपुले‚ मग कैसे मारावे?
स्वजनां मारून आम्ही
पांडव सुखी कैसे व्हावे? ३७
यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः ।
कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् ॥३८॥
बुध्दिभ्रष्ट अन् लोभी
ते मित्रांशि द्रोह करिती
कुलनाशातिल पापाचीही
त्यांना नाहि क्षिती ३८
कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम् ।
कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ॥३९॥
आम्हाला परि कुलक्षयातिल
भीषणता ज्ञात
का नाही मग टाळावा
तो न पडुनि युध्दात? ३९
कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः ।
धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत ॥४०॥
कुलक्षयाने विनाश पावे
कुलधर्माचार
धर्माचारावाचुन माजे
अधर्म जो स्वैर ४०
अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः ।
स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसङ्करः ॥४१॥
अधर्मातुनी कुलस्त्रियांमधी
ये स्वैराचार
स्वैराचारी स्त्रियांकडुनि
हो वर्णाचा संकर ४१
सङ्करो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।
पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः ॥४२॥
वर्णाच्या संकरामुळे
कुल बुडते नरकात
पिंडोदक ना मिळून पूर्वज
पडति रौरवात ४२
दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसङ्करकारकैः ।
उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः ॥४३॥
कुलबुडव्यांच्या संकरामुळे
प्रचलित आचार
विस्मरले जाऊन त्या
कुला उरे न आधार ४३
उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन ।
नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ॥४४॥
अशा कुलातिल मानव जातो
निश्र्चित नरकात
आले आहे असे आजवर माझ्या
श्रवणात ४४
अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम् ।
यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः ॥४५॥
ज्ञात असुनिही पाप
काय जे स्वजन मारण्यात
राज्यसुखाच्या लोभाने
का झालो प्रवृत्त ? ४५
यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः ।
धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत् ॥४६॥
यापेक्षा मी स्वस्थ
रहातो टाकुनिया आयुधे
कल्याणच मम होइल कौरवहस्ते
मरण्यामधे” ४६
सञ्जय उवाच ।
एवमुक्त्वार्जुनः सङ्ख्ये रथोपस्थ उपाविशत् ।
विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः ॥४७॥
संजय म्हणाला
बोलुनि इतके खालि ठेविले
धनुष्य अन् बाण
अन् रथामधि बसुन राहिला
खिन्नमने अर्जुन ४७
इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः ॥
अशा प्रकारे येथे
श्रीमद्भगवद्गीतेच्या
उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील
कृष्णार्जुनसंवादापैकी
अर्जुनविषादयोग नावाचा
पहिला अध्याय पूर्ण झाला|
प्रिय मुकुंदराव,
उत्तर द्याहटवासप्रेम नमस्कार
आपण 'महाद्वार' या अनुदिनीमध्ये आजपासून सुरु केलेली ही मालिका वाचायला घेताना माझ्या या मालिकेविषयीच्या आठवणी उचंबळून आल्या. ही मालिका आपण ३ जुलै २०१२ रोजी 'मैत्री' आपल्या अनुदिनीत सुरु केलीत. त्या वेळी जागेच्या कारणामुळे असावे, आपण मूळचे संस्कृत श्लोक न देता संपूर्ण मालिका ही मराठीत सादर केली होती. आज आपण येथे प्रथम मूळचा संस्कृत श्लोक आणि त्यानंतर त्याचे मराठीत श्लोकबद्ध असे रूपांतर देत आहात. आपला हा निर्णय सर्वच वाचकांना आवडेल आणि या मालिकेचे वाचन त्यांना आपल्याला अभिप्रेत असलेला आनंद मिळवून देईल अशी मला आशा आहे. शुभास्ते पंथानः I
मंगेश नाबर
श्री कर्णिक साहेब,
उत्तर द्याहटवाआपले मानावे तेव्हढे आभार कमीच आहेत. २०१६ पासून आपला हा ब्लॉग तयार केलेला दिसतो पण आज आपल्या मेल मुळे माझ्या लक्षात आला. अर्थात मैत्री मधून समर्थांच्या मनाच्या श्लोकाचे आपले विश्लेषण सर्व भिविकांना उपकृत करीत आहेच पण ब्लॉग मुळे मनन करण्यासाठी ते अधिक सोपे झाले आहे. काही सूचना म्हणा कि विनंती म्हणा आपणापाशी करीत आहे. विचार करून कळवा
१. माझ्या मित्र वर्गात सोशल मीडिया च्या माध्यमातून आपल्या ब्लॉग चा प्रचार/प्रसार करण्याची परवानगी द्यावी.
२. संस्कृत श्लोक पठण करताना सर्व-सामान्य (ज्यांचा कधीही संस्कृतशी संबंध नव्हता) लोकांना अवघड जाते म्हणून ब्लॉग वाचतानाच श्लोकाचे व्हॉइस रेकॉर्डिंग ऐकवता येईल का याचा विचार व्हावा.
३. मैत्री मधूनच श्री सुभाष फडके यांनी उपनिषदावर मराठी मधून विवेचन केले आहे पण कमीत कमी १० जी मुख्य उपनिषदे आहेत ते एका ठिकाणी संस्कृत श्लोकात (आवाजातील पठणासहित ) उपलब्ध नाहीत [जर अशी उपलब्धता आपणास माहीत असेल तर याबाबत कृपया कळवा ] भगवत गीते बरोबर (किंवा नंतर) जर हि उपनिषदे मूळ श्लोकासह सार्थ उपलब्ध करून देण्याचा आपण प्रयत्न करावा हि विनंती
मनाचे श्लोक अन भगवत गीता सार्थ उपलब्ध करून देत असल्याबद्दल पुनः स्च धन्यवाद.