अथ श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या
उपनिषदातील
ब्रह्मविद्यायां
योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
संन्यासयोगो नाम
पञ्चमोऽध्यायः ॥
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील
कृष्णार्जुनसंवादापैकी
संन्यासयोग नावाचा पांचवा
अध्याय
अर्जुन उवाच ।
संन्यासं कर्मणां कृष्ण
पुनर्योगं च शंससि ।
यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे
ब्रूहि सुनिश्चितम् ॥ १
अर्जुन म्हणाला‚
कौतुक करूनी संन्यासाचे पुन्हा प्रशंसशि कर्म
नक्कि कोणते असे योग्य ते‚ सांगावे मज मर्म १
श्रीभगवानुवाच ।
संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ
।
तयोस्तु कर्मसंन्यासात्कर्मयोगो
विशिष्यते ॥ २
श्री भगवान म्हणाले‚
संन्यास आणि कर्मयोग हे श्रेयस्कर दोन्ही
तरिही पार्था‚ कर्मयोग हा श्रेष्ठ
त्यात जाणी २
ज्ञेयः स नित्यसंन्यासी
यो न द्वेष्टि न काङ्क्षति ।
निर्द्वन्द्वो हि महाबाहो
सुखं बन्धात्प्रमुच्यते ॥ ३
महाबाहु, हे जाण‚ नसे जो कर्माचा द्वेष्टा
आणि ना धरी कर्मफलेच्छा असा ज्ञानि द्रष्टा
जरी कर्मसन्यासी असला तरि भेदातीत
निश्र्चिततेने पात्र, व्हावया कर्मबंधमुक्त
३
साङ्ख्ययोगौ पृथग्बालाः
प्रवदन्ति न पण्डिताः ।
एकमप्यास्थितः
सम्यगुभयोर्विन्दते फलम् ॥ ४
सांख्य वेगळा‚ कर्म वेगळे मानति ते
अज्ञ
सांख्य पाळुनी कर्माचाही लाभ मिळविती सुज्ञ ४
यत्साङ्ख्यैः प्राप्यते
स्थानं तद्योगैरपि गम्यते ।
एकं साङ्ख्यं च योगं च यः
पश्यति स पश्यति ॥ ५
सांख्यातुन हो प्राप्त स्थिती जी कर्मांतहि
मिळते
द्रष्टा तो ज्या सांख्य नि कर्महि एकरूप दिसते ५
संन्यासस्तु महाबाहो
दुःखमाप्तुमयोगतः ।
योगयुक्तो मुनिर्ब्रह्म
नचिरेणाधिगच्छति ॥ ६
सन्यासहि हो दुष्कर‚ बसुनी कर्माव्यतिरिक्त
कर्मयोगी मुनिजनांस मिळते चिरशांती त्वरित ६
योगयुक्तो विशुद्धात्मा
विजितात्मा जितेन्द्रियः ।
सर्वभूतात्मभूतात्मा
कुर्वन्नपि न लिप्यते ॥ ७
इंद्रियांवरी ताबा ज्याचा अन् आत्मा शुध्द
अशा कर्मयोग्यास न करते कर्मफलित बध्द
७
नैव किञ्चित्करोमीति
युक्तो मन्येत तत्त्ववित् ।
पश्यञ्शृण्वन्स्पृशञ्जिघ्रन्नश्नन्गच्छन्स्वपञ्श्वसन्
॥ ८
दर्शन‚ स्पर्शन‚ श्रवणोच्चारण‚ श्र्वसन आणि भक्षण
उत्सर्जन‚ निद्रा नि जागृती‚ नयन उन्मीलन ८
प्रलपन्विसृजन्गृह्णन्नुन्मिषन्निमिषन्नपि
।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु
वर्तन्त इति धारयन् ॥ ९
आपआपल्या या सर्व क्रिया इंद्रियेच करती
हे जाणुनि तत्वज्ञ श्रेय कधि स्वत:स ना घेती ९
ब्रह्मण्याधाय कर्माणि
सङ्गं त्यक्त्वा करोति यः ।
लिप्यते न स पापेन
पद्मपत्रमिवाम्भसा ॥ १०
आत्मशांतिस्तव नि:संगपणे कर्मे आचरितो
त्याला कर्मातिल दोषांचा स्पर्शहि ना होतो
कमलपत्र पाण्यात राहुनीदेखिल शुष्क जसे
तसेच सगळ्या दोषापासुनि तो नर मुक्त असे १०
कायेन मनसा बुद्ध्या
केवलैरिन्द्रियैरपि ।
योगिनः कर्म कुर्वन्ति
सङ्गं त्यक्त्वाssत्मशुद्धये ॥ ११
निरिच्छ करिती कर्मे, करण्यासाठि आत्मशुध्दी
अपेक्षीत जी इंद्रियांकडुनि काया-मन-बुध्दी ११
युक्तः कर्मफलं त्यक्त्वा
शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् ।
अयुक्तः कामकारेण फले
सक्तो निबध्यते ॥ १२
योगी त्यागुनि कर्मफला चिरशांतीप्रत जातो
इतरजनांना फलप्राप्तीचा मोहच गुंतवितो १२
सर्वकर्माणि मनसा
संन्यस्यास्ते सुखं वशी ।
नवद्वारे पुरे देही नैव
कुर्वन्न कारयन् ॥ १३
कामेच्छा काढून मनातून निष्कर्मी असतो
तो नऊ द्वारांच्या कायेमधि
शांतीने वसतो १३
न कर्तृत्वं न कर्माणि
लोकस्य सृजति प्रभुः ।
न कर्मफलसंयोगं
स्वभावस्तु प्रवर्तते ॥ १४
कोणाचे कर्तृत्व‚ कर्म वा कर्मफलाची
युती
ईश्र्वर ना घडवितो‚ ही असे प्रकृतिची निर्मिती १४
नादत्ते कस्यचित्पापं न
चैव सुकृतं विभुः ।
अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन
मुह्यन्ति जन्तवः ॥ १५
पुण्य कुणाचे‚ पाप कुणाचे‚ प्रभू नाहि घेत
अज्ञानाच्या आवरणाने जन मोहित होत १५
ज्ञानेन तु तदज्ञानं
येषां नाशितमात्मनः ।
तेषामादित्यवज्ज्ञानं
प्रकाशयति तत्परम् ॥ १६
ज्यांच्या अज्ञानाचा होई ज्ञानाने नाश
सूर्यासम ते ज्ञान देइ त्यां परमार्थ प्रकाश १६
तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः
।
गच्छन्त्यपुनरावृत्तिं
ज्ञाननिर्धूतकल्मषाः ॥ १७
त्या परमार्थामधी ठेविती निष्ठा‚ मन अन् मती
त्यांची पापे धुतली जाउनि मिळे पूर्ण मुक्ती
१७
विद्याविनयसम्पन्ने
ब्राह्मणे गवि हस्तिनि ।
शुनि चैव श्वपाके च
पण्डिताः समदर्शिनः ॥ १८
अशा ज्ञानियांची मग होते समदर्शी दृष्टी
दिसोत त्याना नम्र‚ ज्ञानी वा गाय‚ श्र्वान‚ हत्ती १८
इहैव तैर्जितः सर्गो
येषां साम्ये स्थितं मनः ।
निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद्
ब्रह्मणि ते स्थिताः ॥ १९
समदर्शी ते इथेच राहुनि इहलोका जिंकती
दोषरहित अन् समान ब्रह्मामधे विलिन होती १९
न प्रहृष्येत्प्रियं
प्राप्य नोद्विजेत्प्राप्य चाप्रियम् ।
स्थिरबुद्धिरसम्मूढो
ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः ॥ २०
हर्ष न मानति प्रियप्राप्तित‚ ना दुष्प्राप्याचा
खेद
समबुध्दी निर्मोही अशाना मिळते ब्रह्मपद २०
बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा
विन्दत्यात्मनि यत्सुखम् ।
स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते
॥ २१
विषयसुखाला गौण मानुनि आत्मसुखी होई
तो निर्मोही नरची अक्षय सुखानुभव घेई २१
ये हि संस्पर्शजा भोगा
दुःखयोनय एव ते ।
आद्यन्तवन्तः कौन्तेय न
तेषु रमते बुधः ॥ २२
स्पर्शजन्य जे भोग‚ तयां ना आरंभ न अंत
दु:खद ते कौंतेया म्हणुनी त्यजति बुध्दिवंत
२२
शक्नोतीहैव यः सोढुं
प्राक्शरीरविमोक्षणात् ।
कामक्रोधोद्भवं वेगं स
युक्तः स सुखी नरः ॥ २३
मरणांतापर्यंत आवरुनि सोशि कामक्रोध
असा योगि नर सुखी होतसे‚ पार्था घे बोध २३
योऽन्तःसुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव
यः ।
स योगी ब्रह्मनिर्वाणं
ब्रह्मभूतोऽधिगच्छति ॥ २४
अंतरातुनी सुखी‚ अंतरी पावे आराम
अशास लाभे प्रकाश आणि अंति परब्रह्म २४
लभन्ते
ब्रह्मनिर्वाणमृषयः क्षीणकल्मषाः ।
छिन्नद्वैधा यतात्मानः
सर्वभूतहिते रताः ॥ २५
परब्रह्म हो प्राप्त तयां जे ना मानति द्वैत
पापमुक्त होउनी जे बघती प्राणिमात्र हीत २५
कामक्रोधवियुक्तानां
यतीनां यतचेतसाम् ।
अभितो ब्रह्मनिर्वाणं
वर्तते विदितात्मनाम् ॥ २६
कामक्रोध विरहीत संयमी आत्मज्ञानयुक्त
अशा मुनीना सहजच होते परब्रह्म प्राप्त २६
स्पर्शान्कृत्वा
बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः ।
प्राणापानौ समौ कृत्वा
नासाभ्यन्तरचारिणौ ॥ २७
बाह्यांगाला स्पर्श करोनी नेत्र स्थीर धरी
श्र्वासोच्छवासा रोखुन धरुनी प्राणायाम करी
२७
यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः
।
विगतेच्छाभयक्रोधो यः सदा
मुक्त एव सः ॥ २८
अशा प्रकारे आवरि इंद्रिये मन आणि बुध्दी
इच्छा भय क्रोधातुन सुटुनी पावे तो मुक्ती २८
भोक्तारं यज्ञतपसां
सर्वलोकमहेश्वरम् ।
सुहृदं सर्वभूतानां
ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ॥ २९
यज्ञतपाचा भोक्ता ईश्र्वर मी तिन्ही लोकांचा
मीच प्रियसखा सुहृद सगळया सजीव प्राण्यांचा
अशा मला ओळखील जो जो तो प्राणीमात्र
चिरशांती मिळण्यासाठी तो खचित होइ पात्र
२९
इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां
योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
संन्यासयोगो नाम
पञ्चमोऽध्यायः ॥
अशा प्रकारे येथे श्रीमद्भगवद्गीतेच्या
उपनिषदातील
ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी
संन्यासयोग नावाचा पाचवा अध्याय पूर्ण झाला
श्री शांताराम सानेर यांनी वि-पत्राद्वारे पुढीलप्रमाणे कळवले आहे:
उत्तर द्याहटवाआपल ब्लॉग नेहमीच वाचत असतो । आध्यात्मिक भूक भागते । हा योग पुन्हा पुन्हा यावा अणि आपले आरोग्य निरामय राहो ही योगेश्वर चरणी प्रार्थना । शुभेच्छा व आरोग्य धन संपदा ।
*****
धन्यवाद शांतारामजी. असाच लोभ असू द्यावा ही विन॔ती.
हटवामुकुंद कर्णिक
डॉ. प्रियंवदा कोल्हटकर वि-पत्राद्वारे कळवतात:
उत्तर द्याहटवाआपण पाठवलेला चौथा अध्याय वाचला होता. त्यातील,"चातुर्वर्ण मी उत्पन्न केले."यावर कृपया जास्त प्रकाश पाडू शकाल काय?
पाचव्या अध्यायाचे भाषान्तर भावले. धन्यवाद.
धन्यवाद प्रियंवदाजी,
हटवाआपल्याला हवा असलेला खुलासा लवकरच स्वतंत्रपणे देत आहे.
प्रियंवदाजी,
हटवागुणकर्माअनुसार निर्मिले मी चारी वर्ण
त्यांचा कर्ता‚ तसेच हर्ता मीच असे जाण
या श्लोकाचे स्पष्टिकरण हवे आहे. त्यासंदर्भात:
आपण देवाचे ऋण मान्य करताना चांगले वाईट जे काही या विश्वात आहे ते सर्व देवाचीच करणी आहे असे म्हणत असतो. चुकीचे, बरोबर, जे काही घडले आहे, घडत आहे, किंवा घडणार आहे ते सर्व आपण ईश्वराच्या इच्छेने म्हणा, कृतीने म्हणा, किंवा योजनेने म्हणा, होत आहे असे म्हणून त्याच्यावर सोपवून देतो. ईश्वराचे सर्वश्रेष्ठ सक्षम असणारे अस्तित्व मान्य केल्यानंतर हे आपण अगदी सहज म्हणतो. मग चातुर्वर्ण्य ही आज आपल्याला कदाचित चुकीची वाटत असलेली पण तत्कालीन परिस्थितीत योग्य असू शकणारी अशी समाजव्यवस्था त्याच परमेश्वराने निर्माण केली असेही आपण का म्हणू नये? या श्लोकात तर परमेश्वर स्वत: ते मान्य करतो आहे - गुणकर्मांच्या आवश्यकते प्रमाणे या चार वर्णांचे आयोजन मी 'कर्ता' म्हणून केले आहेत आणि त्यांच्या पलीकडे जाणेही मीच हर्ता - 'अकर्ता' म्हणून योजलेले आहे. आजही आपण ही व्यवस्था आपल्या कळत वा नकळत अनुसरत असतोच. अजूनही आपण पौरोहित्यासाठी ब्राह्मण, संरक्षणासाठी सैनिक-क्षत्रिय, व्यापार उदीम करण्यासाठी वाणी-वैश्य या लोकांकडे नकळत का होईना निर्देश करतो. इथे कुठल्याही वर्गाला श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरवण्याचा प्रश्न येत नाही. परमेश्वरही तसे म्हणत नाही 'गुणकर्मानुसार' हे वर्ण निर्माण केले आहेत असेच म्हणतो. आणि आधुनिक व्यवस्थेच्या संदर्भातही आपण याचे उदाहरण म्हणून hierarchy कडे बोट दाखवू शकतो. managers, executives, security staff, helpers अशी कर्मानुसारची व्यवस्था वापरतो आहोतच ना? तेव्हा चातुर्वर्ण्य या आता कदाचित चुकीच्या वाटणाऱ्या व्यवस्थेच्या निर्मितीची जबाबदारी परमेश्वराने स्वत:ची असल्याची दिलेली प्रांजळ कबुली आपल्याला चुकीची का वाटावी?
या श्लोकाकडे पहाण्याचा आपला दृष्टीकोन कसा होता हे मला माहीत नाही तथापि वर दिलेल्या स्पष्टिकरणामुळे आपल्याला त्यातील गर्भितार्थ आकलन होण्याला मदत होईल असे वाटते.